माझी मॅक्रो फोटोग्राफीशी ओळख - (Sep'17)
तसा माझ्याकडे DSLR कॅमेरा 2010 पासून होता आणि त्यावर वेगवेगळे फोटो मी काढतही असे. पण मागच्या वर्षी (2016) मधे हा विषय जरा seriously घ्यावा असे वाटू लागले. मग त्या दृष्टीने हालचाल सुरू केली. अर्थात ह्या बरोबर थोडी जास्त investment सुद्धा लागणार होती हे लक्षात आल.
२०१६ च्या मे महिन्यात मग नवीन advanced कॅमेरा घेण्यापासून सुरूवात केली. लगेच जून मध्ये माथेरान येथे फोटोग्राफी विशेष ट्रिप ला गेलो. ही अर्थात मॅक्रो विशेष सहल होती आणि मला तर ह्या विषयाची काहीच माहिती नव्हती. पण जाउन तर बघू म्हणून गेलो.
सकाळी लवकर उठून लोकल ने नेरळ गाठल आणि जवळच न्याहारी करून तुफान पावसातच माथेरान येथे पोहोचलो. दस्तूरी नाक्यावरून मग चालत चालत हॉटेल पर्यंत निघालो. पाउस नुसता कोसळत होता त्यामुळे रेनकोट छत्रि जे काही मिळेल ते वापरुन कॅमरा बॅग सांभाळत चालत होतो. पण आजूबाजूला वातावरण अतिशय सुंदर होते. छान घनदाट झाडी आणि धुक्याची ओढलेली चादर म्हणजे केवळ अप्रतिम कॉंबिनेशन. त्या वेळेपर्यंत युवराज गुर्जर हे फक्त नाव ऐकल होत पण त्या पायी प्रवासात ह्या व्यक्तिमत्वाची ओळख व्हायला लागली. रस्त्यातच वेग वेगळे कीटक किवा मशरूम दिसायला लागले (म्हणजे त्याने दाखवले म्हणून कळले). शिवाय बरोबर मकरंद ही होताच आणखी माहिती द्यायला. (पुढे जाण्यापुर्वी, मकरंद आणि युवराज म्हणजे "विहंग travels" चे सर्वे-सर्वा. त्यांच्याच बरोबर ही ग्रूप ट्रिप होती). काही बेडूक किवा साप सुधा दिसले रस्त्यात. अर्थात हे हिरवे साप म्हणजे green vine snake किवा हरणटोळ ही माहिती नंतर कळली.
हॉटेल मध्ये गेल्यावर थोडे स्थिरस्थावर झालयावर आधी मॅक्रो फोटोस ची थोडी माहिती युवराज ने दिली आणि काही अप्रतिम फोटोस सुद्धा दाखवले. इतर सर्व मंडळी त्या विषयाशी सुपरिचित होती, त्यांचा कॅमेरा किवा बरोबर असलेला फ्लॅश सुद्धा स्पेशल होते. जरा कुतुहलानेच मी ह्या गोष्टी बघत होतो. तिथेच रिंग फ्लॅश हा प्रकार पहिल्यांदा बघितला. हा नक्की काय प्रकार आहे असे कुतूहल असेल तर हे फोटो बघा म्हणजे थोडी कल्पना येईल.

  Spider flash  

  Ring Flash  
मग सुरू झाला पहिला ट्रेल..
बाहेर पाउस जोरदार होता, क्षणाचीही उसंत न घेता नुसता तुफान बरसत होता. पण मंडळींचा उत्साह अजिबात कमी नव्हता. पाय वाटेवरून जातांना कितीतरी वेग-वेगळ्या झाडे-फुले आणि कीटक ह्या प्रकारांची माहिती मिळत होती. एवढा पाउस बघून मी तर बॅग मधून कॅमेरा काढला देखील नाही. फक्त मोबाइल कॅमेरयाने जे काही जमले तेवढेच. पण बरोबरीचे सर्वच सरावलेले होते. त्यांचा कॅमरा सतत खटखटत होता, साप, बेडूक, छोटे कीटक सर्व काही त्यांच्या कॅमेरा मध्ये टिपले जात होते.
मग मला मॅक्रो स्पेशल लेन्स आणि स्पेशल फ्लॅश ह्या गोष्टींची थोडी माहिती कळली. छोट्या गोष्टींचे मोठे दिसणारे फोटो काढायचे तर त्यासाठी ह्या स्पेशल लेन्स ची गरज असते.
माथेरान ला मी पुर्वी २-३ वेळा आलो होतो पण जळवा (leeches) हा प्रकार काय असतो, हे प्रथमच कळले. माथेरानच्या दमट ओलसर हवेत त्यांचा सुळसुळाट असतो नुसता. आणि आपल्या पायाच्या उबेने जळवा लगेच आकर्षित होतात आणि लगेच compulsory रक्तदानाचा कार्यक्रम सुरू करतात. मग त्या कशा हाताने उचलून किवा त्यावर मिठाचे पाणी टाकून काढता येतात ह्याचे on-the-job ट्रेनिंग झाले. आणि पुढच्या ट्रिप ला गमबूट किवा तत्सम उंच बूट आणायचेच हे नक्की ठरवल (आधीच मॅक्रो लेन्स ची इनवेस्टमेंट त्यात ही भर)
दुपारी आणि संध्याकाळी अशी भटकंती केल्यानंतर मी रात्रीच्या ट्रेक ला जायचे टाळले आणि त्यामुळे काही निशाचर प्राण्यांचे (bamboo pit viper, toads, etc.) दर्शन झाले नाही.
रविवार सकाळी उठून ब्रेकफास्ट साठी आलो तर तिथेच युवराज ने छताजवळ एक पान दाखवले. ह्या फोटोत दिसताय ते..

  Katydid  
फसलात ना? हे कुठले झाडाचे पान नाही तर हा आहे katydid नावाचा कीडा. आपले पाय शरीराच्या मागे दडवून किती सहज साधलाय हे camouflage.
अजुन एक ट्रेल करून मग आम्ही घरी यायला निघालो. अर्थात पावसाने जराही उसंत घेतली नव्हती, त्यामुळे फोटोस च्या बाबतीत निराशाच पदरी पडली पण ज्ञानात मात्र भरपुर भर पडली.
आता एक लक्षात आल की ह्या प्रकारच्या फोटोस साठी मॅक्रो लेन्स must आहे. मग थोडी आजुन चौकशी केली तेव्हा समजल की हे लेन्स tamron ह्या ब्रँड चे थोडे स्वस्त मिळते (म्हणजे फक्त Canon पेक्षा) पण तरीही निदान काही हजारांची investment नक्की.
मग थोडे प्रयोग केले. Revers-ring नावाचा एक प्रकार मिळतो. जो वापरुन आपले आहे ते लेन्स उलट्या बाजूने कॅमेरयाला जोडता येते. आणि मग आपल्याला हवे तसे magnification मिळू शकते. अर्थात ह्या प्रकारात बरेच अडथळे सुधा आहेत, हे थोडे टेक्निकल होताय पण त्यातल्या त्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. इथे कॅमरा ऑटो-फोकस करत नाही, म्हणजे ते पूर्णपणे मॅन्यूयल. मग "aperture-width" बदलता येत नाही (म्हणजे फोटोचा किती भाग हा फोकस होईल हे ठरवणे कठीण होते). थोडे दिवस हे असेच प्रयोग केले.
ह्या दरम्यान माझा योग-शिक्षक अभ्यासक्रम चालू होता वर्षभर त्यामुळे फोटोस साठी वेळ देता आला नाही. पण २०१७ च्या पावसाळयापासून परत एकदा लक्ष फोटोग्राफी कडे वळवले. जुलै मधे अजुन एक मॅक्रो टूर केली आणि परत एकदा मॅक्रो लेन्स शिवाय गेलो. (ह्या ट्रिप विषयी नंतर सविस्तर लिहिनच .. अर्थात कोणी वाचणार असेल तर) आणि इथे मात्र मी नक्की ठरवल की आता मॅक्रो लेन्स ला पर्याय नाही.
मग त्यानंतर च्या ट्रीप केल्या त्या नवीन लेन्स घेउनच. त्याविषयी विस्ताराने नंतर लिहिता येईल पण उदाहरणा दाखल काही फोटो इथे दाखवतो की जे त्या लेन्स मुळे शक्य झाले.

  Spider with prey  

  Tortoise Beetle  

  Jumping Spider