गोव्यातली जंगले - विहंग ट्रॅव्हल्स बरोबर (Oct'17)

Part 2

३-ऑक्टोबर


परत एकदा सकाळी उठून Vernal Hanging Parrots बघायला बाहेर पडलो ६:३० वाजता. आज थोडे फोटोस काढता आले त्यांचे आणि बरोबर एक हॉर्नबिल चा सुद्धा.

परत एकदा ८:३० हि ब्रेकफास्ट ची वेळ ठरलेली होती आणि ९ वाजता हॉटेल सोडायचे होते. आज थोडे जास्त अंतर जावे लागणार होते. चोरला घाट पार करून म्हादई येथील अभयारण्यात जायचे होते. पण आज चालायचे अंतर तसे जास्त नव्हते आणि ओहोळ किंवा नाले पार करून जायचे नव्हते.

८:३० ला ब्रेकफास्ट तर झाला पण अचानक गुरुजींनी (युवराज) एक टारांटूला सापडल्याची घोषणा केली आणि समस्त फोटोग्राफर मंडळींची धावपळ सुरु झाली, त्यात तो कोळी जरा जास्तच चपळ असल्याने शब्दशः धावपळ झाली. मग परत एकदा वेगवेगळ्या पोझेस मिळवणे चालू झाले, मंडळींनी जमिनीवर लोळण घेत फोटो-सेशन चालू केले.

  Indian Violet Tarantula  

बहुतेक हा टारांटूला सकाळीच मिळाला होता, त्यामुळे organizers ना ह्या होणाऱ्या उशिराची कल्पना होती, आम्हाला आपलं उगीचच असं वाटत होत कि आम्ही उशीर करतोय निघायला. शेवटी एकदाचे आम्ही १० च्या सुमारास बाहेर पडलो. घाट रस्ता बघून दीपाने लगेचच avomine घेऊन टाकली, आणि ते बराच झालं कारण बहुतेक सर्वच रस्ता तसाच होता. साधारण १२ च्या सुमारास आम्ही गंतव्य स्थानी पोहोचलो.

आज आमचे ग्रह अगदी अनुकूल होते म्हणायचे. गजाननने (आमचा लोकल गाईड) अगदी थोड्याच वेळात २ मलबार पिट वायपर शोधले. एक orange morph आणि दुसरा brown morph. आमच्या फोटो टूर पार्टीला आजून काय हवे? २ साप एकदम, म्हणजे मेजवानीच कि

  Malabar Pit-viper - Brown Morph  

  Malabar Pit-viper - Orange Morph  

पुढचा साधारण तासभर तरी ह्यातच गेला मग. सगळ्यांचे मिळून किमान हजार-एक तरी फोटो झाले असतील (अतिशयोक्ती नाही, खरंच ह्याहून जास्तच झाले असतील, पण कमी नाही). सगळ्यांना आपापल्या सोशल मीडिया वर शेअर करायला भरपूर फोटोस मिळाले. तिथून पाच मिनिट्स अंतरावर मग एक धबधबा बघायला चालत गेलो. अर्थात धबधबा खूप लांब होता पण त्या कड्यावरून दिसणारा view छान होता.

तिथेच एक खूपच सुंदर shiny अशा निळ्या रंगाचे एक फुलपाखरू दिसले, अर्थात त्याची गती इतकी होती कि फोटो काढणे कोणालाच शक्य झाले नाही. त्याचे नाव पॅरिस पिकॉक असे कळले, नंतर इंटरनेट वर त्याची छायाचित्रे बघून झाली अर्थातच. हे सगळे होईपर्यंत २ वाजून गेले होते, पोटात कावळे ओरडू लागले होते. अर्थात आज लंच साठी परत रिसॉर्ट वर जायचे नव्हते. जवळच (साधारण २-३ कमी) अंतरावर एका रेस्टॉरंट मध्ये गेलो आणि परत एकदा मंडळींनी माशांवर ताव मारला.

त्या रेस्टॉरंट चे एक खासगी रिसॉर्ट होते मागेच, तिथे तासभर विश्रांती घेण्याचा प्लॅन होता. म्हणजे तशी तिथे बसायला जागा होती, पण मॅक्रो फोटोग्राफी वाल्यांच्या साठी काही संधी तर होत्याच. एक bright orange रंगाचे मश्रुम बघितले तिथे आणि एक किडा (त्याचे नाव हिटलर बग).

  Waterfall view  

  Hitler Bug  

  Mushroom  

हवा अचानक खूप पावसाळी झाली होती, मग आम्ही थोडा वेळ तिथेच बसून विश्रांती घ्यायचे ठरवले. पण गजानन कुठला शांत बसतोय. त्याने पाचच मिनिटात सूचना दिली कि एक हरणटोळ (Green Vine Snake) मिळालाय.

  हरणटोळ  

मग धावतच तिथे निघालो, ५-१० फोटो घेतले असतील-नसतील तेवढ्यात पाऊसाने अचानक जोर धरला. इतका कि, तिथे थांबणे शक्यच झाले नाही, मग गुपचूप आम्ही बस कडे धावलो (झाडांचा आडोसा घेऊन). काही जण चतुराईने छत्री बरोबर घेऊन आले होते त्यामुळे त्यांना धावावे लागले नाही. पावसाचा जोर बघून मग लगेचच परत जायचे ठरले. परतीच्या प्रवासात घाटात एका ठिकाणी landscape फोटो साठी थांबलो, धुक्यामुळे व्हिसिबिलीटी खूप कमी होती पण काढला तसाच फोटो.

साधारण ५:३० च्या सुमारास परत आलो रिसॉर्ट वर. चहाची वेळ तर झालीच होती त्यामुळे रूमवर न जाताच तिथेच विसावलो.

पण दिवस अजून संपला नव्हता. रिसॉर्ट च्या एक्स्पर्ट गाईड्स नि एक अजून साप शोधला होता तिथे. लगेच सर्वांचा थकवा दूर पळून गेला. साप पाळायच्या आत फोटो साठी कॅमेरे तयार ...

हा Forsten's cat snake होता. तसा विषारी नव्हता पण आकाराने आधी बघितलेल्या सापांपेक्षा खूप लांब होता.

ह्या चित्रात तुम्हाला थोडा अंदाज येईल कि किती जवळून हे फोटो सेशन चालू होतं.

  Forsten's cat snake  

  फोटोसाठीची जवळीक  

ह्या नंतर संध्याकाळी थोडा वेळ होता त्यामुळे मग अजून एक slideshow बघायचे ठरले. आज गुरुजींनी किडे, पक्षी वगैरे विषय घेऊन त्याच्या अनुषंगाने जास्त माहिती (चित्रांसहित) सांगितली. फोटो काढताना काय ध्यानात ठेवायला हवे वगैरे.

मधे डिनर ब्रेक घेऊन slideshow परत चालू झाला. ११ वाजेपर्यंत अगदी ज्ञानाचा ओव्हरडोस झाला. उद्या शेवटचा दिवस, त्यामुळे पक्षी बघायला सकाळी उठणे भागच होते, तेव्हा परत एकदा माझा रात्रीचा ट्रेल कॅन्सल.

आणि आज बॅग सुद्धा भरायला लागणार होती, २-३ दिवसात सगळे सामान अस्ताव्यस्त झालेच होते, ते आवरून ठेवावे लागणार होते, म्हणजे उद्या घाई करावी लागणार नाही. आणि हो, ह्या शिवाय उद्या दुपारी १२ वाजताच रिसॉर्ट सोडायचा असल्याने ब्रेकफास्ट आणि लंच दोन्ही लवकर करावे लागणार होते.

४-ऑक्टोबर


परत एकदा सकाळी लवकर उठून birding साठी बाहेर पडलो. पण आज vernal handing parrot आमच्यावर बऱ्यापैकी मेहेरबान होते. थोडे जास्त संख्येने ते उपस्थित होते त्यामुळे बऱ्यापैकी फोटोस मिळाले आज.

  Little Spider-Hunter  

  Sunbird  

आज ब्रेकफास्ट ७ वाजताच होता आणि बाहेरचा ट्रेल ऑपशनल होता, मग परत एकदा रिसॉर्ट मधेच पक्षांच्या मागे लागलो. त्यामुळे आज इतर थोडे फोटोस देखील मिळाले.

  Vernal Hanging Parrot  

  Vernal Hanging Parrot  

जेवण आज ११ वाजता होते. त्यामुळे मग फोटोस आवरते घेतले आणि बॅगा आवरून वेळेत तयार झालो. तेवढ्या वेळातही युवराजने माळरानावर एक ट्रेल करून काही special फोटोस मिळवलेच. जे ३-४ जण त्या ट्रेल वर गेले त्यांना मिळाले एक ड्रॉसेरा इंडिका नावाचे कीटकभक्षी झाड, अगदी त्याच्या पकडलेल्या भक्षासहित.

अरे हो, पण आजचा दिवस अजून दोन साप बघण्याचा होता. त्यातला एक Buff striped keelback किंवा नानेटी आणि दुसरा आवारात सापडलेला ताजा-ताजा hump-nosed pit viper. मंडळी बाहेरच्या ट्रेल ला निघण्या पूर्वी आम्ही ह्या दोन सापांचेही खूप फोटो काढले.

  नानेटी  

  Hump-nosed pit viper  

जेवण आटोपून बरोबर १२ वाजता आम्ही रिसॉर्ट सोडला. आमच्यापैकी काही जण परतीचा प्रवास ट्रेन ने करणार होते, त्यामुळे आधी त्यांना स्टेशन वर सोडून मग आम्ही एअरपोर्ट ला गेलो आणि सुरु झाला ४ दिवसातला सर्वात कंटाळवाणा भाग. आमचे विमान होते ६:४५ चे आणि आम्ही विमानतळावर पोहोचलो २ वाजता. एअर-इंडिया ने तर ४ वाजेपर्यंत बोर्डिंग पास सुद्धा द्यायला नकार दिला. कसाबसा वेळ काढला तिथे, त्यात विमान पाऊण तास उशिरा सुटले. घरी येई-पर्यंत १० वाजून गेले होते.

प्रवास संपला खरा पण खूप-सगळ्या मस्त आठवणी देऊन गेला. जाताना थोडी धाकधुक होती कि आपल्याला अशी ट्रिप आवडेल कि नाही. पण हा अनुभव वेगळाच होता. त्यामुळे पुढच्या वर्षी परत सुद्धा अशीच ट्रिप करायला हरकत नाही अर्थात असा ग्रुप बरोबर असेल तर.

शेवटी थोडं आमच्या ग्रुप विषयी.
मी आणि दीपा धरून आम्ही ११ जण होतो ह्या ट्रिप ला. मकरंद आणि युवराज म्हणजे विहंग चे organizers आणि निसर्ग ह्या विषयातले तज्ज्ञ. अन्वय आणि अविनाश दोघे पुण्याहून आले होते. हे ग्रुप मधले सर्वात तरुण सदस्य. अन्वय फिनान्स क्षेत्रातला आणि अविनाश IT मधला. त्यानंतर इस्माईल आणि मारिया सामीवाला हे विहंग चे एक जुने-जाणते मेंबर. इस्माईल भाई फार्मा क्षेत्रातले आणि मारिया गृहिणी. मग नैनेश अमीन हे वकील मित्र आणि ग्रुप चे सर्वात अनुभवी मेंबर म्हणजे युधी काका (युधिष्ठीर वैद्य). अर्थात त्याच्या उत्साहाकडे आणि मूर्तीकडे बघून ते आमच्यापेक्षा तरुणच वाटत होते खरेतर. त्याशिवाय कांचन देशमुख हि पनवेल स्थित जाणती फोटोग्राफर. केवळ फोटोग्राफी करता बिचारी आपल्या मुलीला घरी सोडून आली होती.

  आमचा विहंग चा ग्रुप  

  Nature's Nest च्या गाईडस सोबत